old pension schemes अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana-APY) ही कमी गुंतवणुकीत पेन्शनची (Pension) हमी देणारी सरकारची यशस्वी योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार 60 वर्षांनतर दरमहा किमान 1000 ते 5000 रुपयांच्या पेन्शनची हमी देते. 40 वर्ष वयापर्यंतची व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते.

60 वर्षानंतर वार्षिक 60 हजार रुपये पेन्शन

old pension scheme समाजातील सर्व घटकांना पेन्शनची सुरक्षा मिळावी या उद्देशानं सरकारनं ही योजना आणली आहे. विमा नियामक (Insurance Regulator) आणि पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) यांनी या योजनेतील सहभागासाठीची वयोमर्यादा वाढवण्याची शिफारस केली आहे. या योजनेत दरमहा ठराविक गुंतवणूक केल्यास 60 व्या वर्षांनतर दरमहा एक हजार ते 5 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. यामध्ये तिमाही, सहामाही गुंतवणूकीचाही पर्याय आहे. लहान वयात गुंतवणूक सुरू केल्यास कमी गुंतवणूकीत जास्त लाभ मिळतात. दर सहा महिन्याला 1239 रुपये जमा केल्यास 60 व्या वर्षानंतर दरमहा 5 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 60 हजार रुपये पेन्शन मिळू शकते.दरमहा गुंतवा 210 रुपये.

दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळवायची असेल आणि वयाच्या 18 व्या वर्षी तुम्ही यात गुंतवणूक सुरू केलीत तर तुम्हाला दरमहा 210 रुपये गुंतवणूक करावी लागेल. तिमाही गुंतवणूक करणार असाल तर 626 रुपये आणि सहामाही तत्वावर 1239 रुपये गुंतवणूक करावी लागेल. महिन्याला एक हजार रुपये पेन्शन अपेक्षित असेल तर 18 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करणाऱ्या व्यक्तीला दरमहा फक्त 42 रुपये भरावे लागतील.

लहान वयात गुंतवणूक सुरू करणं फायद्याचं

60 व्या वर्षांनतर दरमहा 5 हजार रुपये पेन्शन हवी असेल आणि तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक सुरू केलीत तर तुम्हाला 25 वर्षासाठी सहामाही 5 हजार 323 रुपये भरावे लागतील. याप्रकारे तुमची एकूण गुंतवणूक 2.66 लाख रुपये होईल. तर 18 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केल्यास हीच रक्कम फक्त 1.04 लाख रुपये असेल. म्हणजेच एकाच पेन्शन रकमेसाठी उशीरा गुंतवणूक सुरू केल्यानं तुम्हाला 1.60 लाख रुपये अधिक भरावे लागतात.

या योजनेची वैशिष्ट्ये

– या योजनेत मासिक, तिमाही आणि सहामाही तत्वावर गुंतवणूक करता येते.

– इन्कमटॅक्सच्या कलम 80 सीसीडी अंतर्गत कर सवलत मिळते.

– एका सदस्याच्या नावे केवळ 1 खाते उघडले जाईल.

– सदस्याचा 60 वर्षांपूर्वी किंवा नंतर मृत्यू झाला तर पेन्शनची रक्कम पत्नीला दिली जाईल.

– सदस्य आणि त्याची पत्नी दोघेही मरण पावले तर नामनिर्देशित व्यक्तीला पेन्शन दिली जाईल.